नांदुरखेडा शिवारात दोन एकरवरील मका खाक

0
रावेर:- रावेर स्टेशन रोडवरील नांदुरखेड़ा शिवारातील एका शेतातल्या मक्याला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन एकर मका जळून खाक झाला. स्टेशन रोडवरील नांदुरखेडा शिवारात सुकदेव शिंदे यांच्या गट नं.151 मधील चार एकर मका कापून ठेवला असताना  शेतातून गेलेल्या वीज वाहक तारांमध्ये स्पार्किंग होवून शॉर्टसर्किटने मक्याला आग लागली.  आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या वाहनानेआग विझवली. घटनास्थळी पंचनाम्यासाठी महसूल प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी धाव घेतली.