रावेर- तालुक्यातील नांदुरखेडा येथील विश्वनाथ एकनाथ नाथ (45) यांचा हॉटेल जलसाच्या मागील शेत शिवारात विद्युत खांबावर शॉक लागल्याने मृत्यू झाला. ही घटना 1 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. राहुल माधव नाथ यांनी खबर दिल्यावरून रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ओमप्रकाश सोनी करित आहे