नांदेडातील दोघा भाविकांचा अपघातात मृत्यू

0

नांदेड । सत्य गणपती दर्शनासाठी दुचाकीवरून जाणार्‍या दोन भाविकांचा भोकर फाटा येथे अपघातात मृत्यू झाला. ही घटना आज आज दि 3 रोजी मंगळवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास घडली. गोविंद धोंडीबा करडीले (20) व सुनील गंगाराम मस्के (19) असे मृतांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, गोविंद आणि सुनील हे दोघे नागापुर येथील रहिवासी आहेत.

आज पहाटे हे दोघे बाईकवरून नांदेड येथून चतुर्थी निमित्त सत्य गणपती दर्शनासाठी जात होते. पहाटे पाच वाजेच्या सुमारास आसना पुलाच्या कडेला भोकर फाटा येथे त्यांच्या बाईकची समोरून येणार्‍या कंटेनर सोबत धडक झाली. यात बाईक कंटेनरच्या आत घुसली यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात ईतका भंयकर होता कि, रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. अपघातची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.