भुसावळ : रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने नांदेड-श्री गंगानगर दरम्यान साप्ताहिक आणि द्वि साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
नांदेड-श्री गंगानगर साप्ताहिक विशेष गाडी
अप 02439 साप्ताहिक विशेष गाडी 18 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत दर रविवारी नांदेडहून 11.05 वाजता सुटेल आणि श्री गंगानगरला दुसर्या दिवशी 8.15 वाजता पोहोचणार आहे. डाऊन 02440 साप्ताहिक विशेष गाडी 16 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवारी श्री गंगानगरहून 13.25 वाजता सुटेल आणि नांदेड ला दुसर्या दिवशी 21.40 वाजता पोहोचेल. या गाडीला पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, खंडवा,
इटारसी, भोपाल, बीना, झांसी, ग्वालियर, आग्राकान्ट, मथुरा, न्यूदिल्ली, रोहतक, जिंद, जाखल, संगरूर, धुरी बर्नाला, तापा रामपुरा फुल, भटिंडा, मंडी दबवली, सांगारीया, हनुमानगढ,सादूलहर आदी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
नांदेड -श्री गंगानगर द्वि साप्ताहिक विशेष गाडी
अप 02485 साप्ताहिक विशेष गाडी 12 एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत दर सोमवार, गुरुवार येथून नांदेड हून 11.05 वाजता सुटेल आणि श्री गंगानगरला दुसर्या दिवशी 7.30 वाजता पोहोचणार आहे. डाऊन 02486 साप्ताहिक विशेष गाडी 10 एप्रिलपुढील आदेशापर्यंत दर शनिवार, मंगळवारी श्री गंगानगरहून 2.30 वाजता सुटेल आणि नांदेड ला दुसर्या दिवशी 9.40 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, भोपाल, बीना, झांसी, ग्वालियर, आग्राकान्ट, मथुरा, न्यू दिल्ली, रोहतक, जिंद, जाखल, संगरूर, धुरी, बर्नाला, तापा रामपुरा फुल, भटिंडा, गिद्दरबहा, मलोट, अबोहर स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.