नांद्रा परीसरात डेरेदार वृक्षाची भरदिवसा कत्तल

0

वन विभागाचे दुर्लक्ष विट भट्टींसाठी वापर
नांद्रा । येथील परीसरात हळुहळु शेत जमीन खाली होत आहे. त्यामुळे शेतांमधील वृक्षाची,मोठ्या प्रमाणावर होतांना दिसत आहे.वृक्ष तोड करणार्‍या असंख्य टोळ्या या भागात मोठ्या प्रमाणावर आहे. वनविभागाची कोणत्यापरवानगी किंवा कारवाई होत नसल्यामुळे किरकोळ देवान-घेवानीतून हा सर्व वृक्षतोडीचा व्यवसाय फोफावत आहे. विट भट्यांसाठी लाकडांची मोठी मागणीया भागात वरसाडे,नांद्रा ,लासगाव, या गावांमधे विट्टांच्या मोठ्या प्रमाणात विट भट्ट्या आहेत. या विटा भाजण्यासाठी कोळसा म्हणून लाकडाचा वापर केला जातो. मागणी मोठी असल्यामुळे दोन पैसे जास्तचे देऊन वृक्ष विकत घेतले जातात. आणि कामासाठी लागणारे लाकुड वखारींमधे व जळाऊ लाकुळ हे विटभट्यांसाठी वापरले जात आहे. वनविभागातील आर्थिक देवान घेवाण असल्यामुळे या भागात डेरेदार वृक्षच शिल्लक राहिलेले नाहीत. वृक्ष तोडीसाठी कटरचा वापरकमी वेळात असंख्य वृक्षाची कटरच्या सहाय्याने तोड केली जाते, मनुष्य बळही कमी लागते रात्री या अवैद्ध लाकडांची वाहतूक केली जाते. या भागात बांबरुड, पाचोरा, वडगाव, बोरनार या गावातील असंख्य व्यापारी या भागात वृक्षतोड करत आहेत.

”या अवैद्ध वृक्षतोडीबाबत आम्ही कार्यवाही करत असतो. एक ट्रक, ट्रॅक्टर आम्ही पकडले आहे. अजुन वृक्षतोड करणारे सापडले तर योग्य ती कार्यवाही करु.व नियमानुसार कायदेशीर प्रक्रिया आम्ही पार पाडू.”
– सुनिल भिलावे, वनपाल, पाचोरा