नांद्रा परीसरात विजेच्या जिर्ण तारांमुळे अपघात होण्याची शक्यता

0

तक्रारी देवूनही विज मंडळाचे अक्षम्य दुर्लक्ष

नांद्रा । परीसरातील गावांमधे 1965 साली विज दाखल झाली होती. तेव्हापासुन तर आजपर्यंत विजेच्या तारा कधीही बदलवण्यात आलेल्या नाही. विजेच्या तारांबरोबरच खांबही मातीच्या भरावात दाबला गेल्याने तारा ह्या लोंबकळत असल्यामुळे या भागात विजेचा फाँल्ट होने, तारा तुटून पडणे, तारेला तार लावुन आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. विजेच्या तारांचे होणार्‍या घटना पहाता विज मंडळा कडुन ते विज मंडळाचे साहित्य बदवण्यासाठी कोणत्याही प्रकाराची दखल घेतली जात नसल्यामुळे ह्या घटना घडत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करत आहेत. नांद्रासह कुरंगी परीसरात शेतकर्‍यांचे कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणावर असते. ते वाहून नेण्यासाठी वाहनांचा वापर होतो ते गावातून काढताना लोबकलेल्या विज तारांना स्पर्श होत असल्याने घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असाच काहीसा प्रकार मागील वर्षी म्हसीकोठा तालुका सोयगाव येथे तीन कापूस हमालांना आपला जीव गमवावा लागला होता. अजून अशी घटनाची पुनरावृत्ती होण्याची वाट तर महावितरण पाहत नाही, अशी चर्चा नागरिक करीत आहे.

– कोट
”लोबलेल्या तारांबाबत आम्ही वेळोवेळी वरीष्ठांना माहिती देऊन काम करीत आहेत. लवकरच धोकादायक ठिकाणी ठेकेदारांमार्फत काम सुरू करून या तक्रारी लवकरच निवारण कर”
– दिपक महाजन, कनिष्ठ अभियंता, विज वितरण कंपनी, नांद्रा