पाचोरा। येथुन जवळच असलेल्या नांद्रा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री 10 च्या सुमारास पाऊस सुरु व लाईट बंद असतांना कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया झालेल्या महीलांच्या विभागात मागुन चार ते पाच चोरट्यांनी प्रवेश करुन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. ही बाब तेथील रुग्णांनी आपल्या नातेवाईकांना सांगितले रात्रीच नातेवाईक दाखल झाल्यावर शोधाशोध झाली परंतु काहीही हाती आले नाही. सकाळी पाचोरा पं.स.सभापती सुभाष पाटील, जि.प.सदस्य पदमसिंग पाटील, जि.प.सदस्य मधुकर काटे, पं.स.सदस्य बंन्शीलाल पाटील, भाजपा तालुका प्रमुख नंदु सोमवंशी यांनी प्रा.आ.केद्राला भेट देऊन महीलांची विचारपुस केली. कर्मचार्यांना योग्य सुचना दिल्या. या दवाखान्यात ओपीडीला कार्यरत आरोग्य सेविकेची बदली झाल्यामुळे येथे रात्रीच्या व दिवसाच्या कर्मचार्यांच्या दिवट्या लावण्यात येतात. परंतु कर्मचारी दिवट्यावर हजर रहात नसल्यामुळे हा प्रसंग घडला.
यापुढे सर्वानी जबाबदारी ने प्रा.आ.केंद्रात राहुन काम करावे अशा सुचना सभापती सुभाष पाटील यांनी दिल्या. येथील पुरुष कर्मचारी धर्मंद्र पावार यांनी जि.प.च्या स्टेनोच्या गाडीवर प्रतीनियुक्ती करुण घेतली आहे. ती आज रद्द करुन नांद्रा प्राथमिक आरोग्य केंद्रात एक पुरुष कर्मचारी मिळवुन देतो. येथील आरोग्य सेविकेची जागा बदल्यामधे रिक्त असल्यामुळे बांबरुड येथील काँन्ट्रँक आरोग्य सेविका तेथे अतिरिक्त असल्यामुळे व तेथे कायम स्वरुपी आरोग्य सेविका असल्यामुळे तेथील अतिरिक्त आरोग्य सेविकाची नांद्रा येथे ओपीडीला बदली करण्यासाठी सभापती पुढाकार घेऊन आरोग्य सेविका उपलब्ध करुण देणार असल्याचे सभापती सुभाष पाटील यांनी सांगितले. येथील अँम्बुल्नस वर ड्रायव्हर नसल्यामुळे अडचणी येतात. त्यामुळे केंद्राला अनुभवी डॉ.शेखर पाटील यांची नियुक्ती करण्याची मागणी.