जळगाव : तालुक्यातील नांद्रा येथे गुरूवारी सकाळभ 10.30 वाजेच्या सुमारास एका ओमनी गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने जिवीत हाणी टळली. मात्र, गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नांद्रा येथे सकाळी 10.30 वाजेच्यासुमारास ज्ञानेश्वर काशिनाथ पाटील रा.चंदूआण्णा नगर यांची मारोती ओमनी क्रमांक एमएच-30-पी-287 ने आज अचानक पेट घेतला. यामध्ये सुदैवाने कुठलीही जिवीतहानी झाली नसून सुमारे 1 लाख 20 हजाराचे नुकसान झाल्याचे तालुका पोलिस स्टेशनला नोंद केली आहे.