नाईक महाविद्यालयात पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

0

शहादा। येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेश घेतलेल्या विद्यार्थीचा शैक्षणिक साहित्य देवून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.ए.एन.पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून सस्थेचे विभागीय सचिव प्रा.संजय जाधव सोनामाई शिक्षण सस्थेचा सचिव वर्षा जाधव, उपप्राचार्य आर.बी.मराठे, डॉ.एच.एस.पाटील उपस्थित होते.

प्रथम प्रतिमा पुजन करुन प्रथम वर्ष कला व सायन्स शाखेत प्रवेश घेतलेल्या गोरख पावरा, कविता साळुंखे, प्रांजल मोरे, मन्यार सिरिनबानो या विद्यार्थ्यांच्या प्रातिनिधिक स्वरुपात पेन व गुलाबपुष्प देवुन स्वागत करण्यात आला. वर्षा जाधव यांनी यावेळी बोलताना विद्यार्थ्यांना वाचन लेखन व संस्कृती अमलात आणावी, आरोग्याची काळजीसाठी स्वच्छतेवर भर द्यावा, अभ्यासासाठी परिश्रम घ्या, तर प्राचार्य डॉ.ए.एन.पाटील, प्रा.एस.के.पाटील, आर.आर.सोनवणे, आर.डी.पाटील, मालीनी आढाव यांनीही वेगवेगळ्या विभागाची माहिती दिली.