बुद्धिबळ स्पर्धेत प्रतिक्षा गिरासे, तायक्वांदोत मुश्ताक खाटीकचे यश
शहादा । येथील वसंतराव नाईक विद्यालयातील विद्यार्थी मुश्ताक खाटीक व प्रतिक्षा गिरासे या दोघी खेळाडुंनी जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये बाजी मारल्याने विभागीय स्तरावर निवड झाली आहे. क्रिडा व युवक सेवा संचलनालय पुणे व जिल्हा क्रिडा कार्यालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच झालेल्या पावसाळी तालुका आणि जिल्हास्तरावरील विविध स्पर्धांमध्ये वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील खेळाडूंनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे.
आकाश मुखडे तालुकास्तरीय स्पर्धेत यशस्वी
बुद्धिबळ स्पर्धेत १९ वर्ष वयोगटात प्रतीक्षा चंद्रसिंग गिरासे हिने जिल्हास्तरावर यश संपादन केल्याने तिची नाशिक विभागीय स्तरावर निवड झाली आहे. तर याच स्पर्धेत धिरज अनिल जयस्वाल याची जिल्हास्तरावर निवड झाली आहे. कराटे, तायक्वांदो या दोन्ही स्पर्धेत १९ वर्षे वयोगटात मुश्ताक फकिरोद्दीन खाटीक याने यश मिळवले आहे. तायक्वांदो स्पर्धेसाठी त्याची विभाग स्तरावर तर कराटे स्पर्धेत जिल्हास्तरावर त्याची निवड झाली. याच विद्यालयातील आकाश मुखडे याने तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत १५०० मीटर धावणे या स्पर्धेत यश संपादन केले. या सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे विभागीय सचिव संजय जाधव, वर्षा जाधव, मुख्याध्यापक संजय राजपुत, उपप्राचार्य आर जे रघुवंशी व पर्यवेक्षक सुनील सोमवंशी यांनी कौतुक केले.