नागपुरात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या

0

नागपूर: एकाच कुटुंबातील ५ जणांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना राज्याची उपराजधानी असलेल्या आराधना नगरमध्ये घडली. कमलाकर पवणकर आणि त्यांच्या कुटुंबियांची अज्ञाताने गळा चिरून हत्या केली. मात्र, ही हत्या नेमकी कुणी आणि का केली याबाब स्पष्ट माहिती पुढे आली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळावर हजेरी लावली. पोलीस पुढील तपास करत आहेत.