नागपुरात विराट विजय

0

नागपूर । भारताच्या चारही गोलंदाजांनी चौथ्या दिवशी प्रभावी मारा करुन, नागपूर कसोटीत भारतीय संघाला श्रीलंकेवर एक डाव आणि 239 धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. या कसोटीत भारतीय संघाने पहिल्या डावात 405 धावांची आघाडी घेतली होती. पण श्रीलंकेचा दुसरा डाव आदल्या दिवशीच्या एक बाद 21 धावांवरून सर्व बाद 145 असा गडगडला. तिसर्‍या दिवशी पहिला गडी गमावल्यानंतर चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच श्रीलंकेच्या फलंदाजांनी हाराकिरी करत विकेट फेकणे सुरू ठेवले. श्रीलंकेचा एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांचा सामना करू शकला नाही. कर्णधार दिनेश चंडिमलने अर्धशतकी खेळी करत आपल्या संघाचा पराभव दूर ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने त्याचे प्रयत्न तोकडे पडले. कर्णधार दिनेश चंडिमलने अर्धशतकी खेळी करत आपल्या संघाचा पराभव दूर ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र, इतर फलंदाजांची साथ न लाभल्याने त्याचे प्रयत्न तोकडे पडले. श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडिमलने 61 धावांची खेळी उभारून एक खिंड लढवली. त्याने सुरंगा लकमलच्या साथीने नवव्या विकेटसाठी 58 धावांची झुंजार भागीदारीही रचली. पण त्यांना श्रीलंकेचा डावाचा मारा चुकवता आला नाही. भारताकडून रविचंद्रन अश्‍विनने चार विकेट्स घेऊन कसोटी क्रिकेटमध्ये तीनशे विकेट्सचा टप्पा गाठला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद तीनशे विकेट्स घेण्याचा पराक्रम त्याच्या नावावर जमा झाला. ईशांत शर्मा, उमेश यादव आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन विकेट्स घेऊन त्याला छान साथ दिली. भारत आणि श्रीलंका यांच्यातली तिसरी कसोटी 2 डिसेंबरपासून दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर सुरू होणार आहे. त्यामुळे या कसोटीत श्रीलंकेचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

नागपूर कसोटीत भारताचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्‍विनने 63 धावांत चार विकेट्स काढून श्रीलंकेचा दुसरा डाव गुंडाळण्यात प्रमुख भूमिका बजावली. क्रिकेट इतिहासात आर अश्‍विनने असा विक्रम केला आहे . अश्‍विनने कसोटी विकेट्सचे त्रिशतक साजरं केलंच, शिवाय सर्वात जलद 300 विकेट्स घेणारा गोलंदाज म्हणून त्याची नोंद झाली आहे. अश्‍विनने 54 कसोटी सामन्यांमध्येच तीनशे विकेट्स घेऊन डेनिस लिलीचा 56 कसोटी सामन्यांचा विक्रम मोडीत काढला. ऑस्ट्रेलियाचे महान गोलंदाज लिली यांनी 1981 मध्ये 56 कसोटी सामन्यात 300 विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर 36 वर्षांनी अश्‍विनने हा विक्रम मोडला आहे. इतकेच नाही तर अश्‍विनने हा विक्रम करताना 300 विकेट्स घेणार्‍या भल्याभल्यांना मागे टाकले आहे. यामध्ये श्रीलंकेचा मुथैय्या मुरलीधरन (58 कसोटी), रिचर्ड हेडली, माल्कम मार्शल आणि डेल स्टेन (61 कसोटी) यांचा समावेश आहे.

10 वर्षांनंतर मोठा विजय
नागपूर कसोटीत भारताचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्‍विनने 63 धावांत चार विकेट्स काढून श्रीलंकेचा दुसरा डाव गुंडाळण्यात प्रमुख भूमिका बजावली. क्रिकेट इतिहासात आर अश्‍विनने असा विक्रम केला आहे . अश्‍विनने कसोटी विकेट्सचे त्रिशतक साजरं केलंच, शिवाय सर्वात जलद 300 विकेट्स घेणारा गोलंदाज म्हणून त्याची नोंद झाली आहे.

आर अश्‍विन पाचवा गोलंदाज
दरम्यान, कसोटीमध्ये 300 विकेट्स घेणारा अश्‍विन हा पाचवा गोलंदाज ठरला आहे.अश्‍विनच्या पुढे अनिल कुंबळे (619), कपिल देव (434), हरभजन सिंह (417) आणि झहीर खान (311) हे गोलंदाज आहेत.

भारताचे डावाने मिळवलेले विजय
1 एक डाव 239 धावांनी श्रीलंकेविरुद्ध, नागपूर 2017
2 एक डाव 239 धावांनी बांगलादेशविरुद्ध, ढाका 2007
3 एक डाव 219 धावांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलकाता 1998
4 एक डाव 198 धावांनी न्यूझीलंडविरुद्ध नागपूर, 2010नागपुरात विराट विजय