नागपूर येथील स्पर्धेत उंच उडीत अभय गुरवला रौप्य पदक

0

नंदुरबार । भारतीय अ‍ॅथलेटिक्स फेडरेशनच्या मान्यतेने व महाराष्ट्र अ‍ॅमेच्युअर अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने घेण्यात आलेल्या 29 व्या पश्चिम विभागीय ज्युनिअर अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेचे नुकतेच नागपूर येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ज्युनिअर गटात नंदुरबार जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे खेळाडू अभय गुरव (यशवंत कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार) याने उंच उडीत 1.82 मीटर उंची मारत रौप्य पदक जिंकले. त्यापूर्वी पुणे येथे झालेल्या ज्युनिअर गटाच्या राज्यस्तरीय स्पर्धेतही अभय गुरवने 1.80 मीटर अंतराची उंची गाठत रौप्य पदकच पटकाविले होते. अभय राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्राविण्य मिळविण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. त्याच्या या यशाबद्दल संघटनेचे अध्यक्ष आ.चंद्रकांत रघुवंशी, प्रा.दिलीप जानराव यांनी अभिनंदन केले आहे.