नागपूर येथे कोतवाल संघटनेचा महामोर्चा

0

नांद्रा । जळगाव जिल्ह्यातील कोतवालांचा 11 डिसेंबर रोजी नागपुर येथे प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना जळगाव जिल्हाध्यक्ष विजय कोळी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. कोतवालांना चतुर्थ श्रेणी मिळालीच पाहीजे सेवा निवृत्त व मयत कोतवाल याच्या वारसांना सेवेत नोकरी व विधवांना किमान 3 हजार मानधन देण्यात यावा, अश्या अन्य मागण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. गावातील सर्व खात्याचे काम करणारा कोतवाल गेल्या 50 वर्षापासुन न्यायापासून वंचित आहे. कोतवाल हा महसुल विभागात महत्त्वाचे पद असुन सुध्दा शासन जाणीवपूर्वक कोतवालांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. महाराष्ट्रातील शासनाने नेमणूक केलेला 24 तास काम करणारा कोतवालांना शासनाकडुन तुटपुंजे मानधन 5 हजार रुपये व चप्पल भत्ता 10 रुपये दिले जात असून महागाई भत्ता मिळावा यांसह इतर मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले आहे.

आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
महसुल मंत्री ना. चद्रकांत पाटील यांनी 2016 च्या हिवाळी अधिवेशनात कोतवालांना चतुर्थ श्रेणीत समावेश करण्यासाठी 1 वर्षाच्या आत करून घेण्याचे आश्‍वासन ेदिले होते. महसुल मंत्री चद्रकांत पाटील यांनी दिलेल्या शब्दाला 8 डिसेंबर रोजी 1 वर्षे पुर्ण होत असल्याने महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना च्या वतीने नागपूर मध्ये 11रोजी महामोर्चा निघणार आहे. सदर आंदोलनात जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व कोतवाल महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना यांनी आयोजीत केलेल्या महामोर्चा मधे सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेतर्फे करण्यात आले आहे.