नागपूर विभागात ब्लॉक ; अप-डाऊन नागपूर पॅसेंजर 31 पर्यंत रद्द

0

वारंवार पॅसेंजर रद्द होत असल्याने रेल्वे प्रवाशांना मनस्ताप

भुसावळ- नागपूर रेल्वे विभाग तांत्रीक कामासह दुरुस्तीच्या कार्यासाठी 18 ते 31 जानेवारीदरम्यान ब्लॉक घेण्यात येत असल्याने अप-डाऊन नागपूर पॅसेंजर रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वेच्या कामासाठी केवळ पॅसेंजर रद्द केली जात असल्याने रेल्वे प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत असून रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेविषयीदेखील यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. डाऊन 51285 भुसावळ-नागपूर व अप 51286 नागपूर-भुसावळ पॅसेंजर 18 ते 31 जानेवारीदरम्यान रद्द करण्यात आल्याचे स्थानिक रेल्वे प्रशासनाने कळवले असून प्रवाशांनी याबाबत दखल घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.