नागराज मंजुळेच्या ‘नाळ’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

0

मुंबई : नागराज मंजुळे म्हंटल कि ‘सैराट’ आणि ‘फँड्री’सारख्या तुफान प्रसिद्धी मिळवलेल्या चित्रपट डोळ्यासमोर येतं. आता नागराज मंजुळेचा ‘नाळ’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा गावात राहणाऱ्या ८ वर्षीय मुलाची कथा या चित्रपटातून प्रेक्षकांना दिसणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतानाच चित्रपटाचा पहिला ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

या ट्रेलरमधून चैतन्य या ८ वर्षांच्या मुलाची भावनिक कथा आणि अनपेक्षित प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.