नंदुरबार । अवघ्या महाराष्ट्र फुटबॉलमय या अंतर्गत आरोग्य व आनंददायी व सुदृढतेसाठी व मुलांना खेळाकडे आकर्षित करण्याकरिता तसेच भारतात होणार्या सतरा वर्ष फिफा विश्वकप स्पर्धेनिंमित खेळाडुंना प्रोत्साहित व शुभेच्छा देण्याकरिता व खेळ संस्कृतीपासुन विद्यार्थी दुरावत चाललेला असल्याने त्यांना परत मैंदानाकडे आकर्षित करण्याकरिता महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये फुटबॉल या खेळामार्फतमैदानाकडे ओढ निर्माण व्हावी म्हणुन आज फुटबॉलमय वातावरण तयार झाले होते. नंदुरबार जिल्ह्यात देखील विविध शहरांमध्ये फुटबॉल सामने घेण्यात आले. मख्यकार्यक्रम पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थित घेण्यात आला.
पोलीस विभाग संघ विजयी
यावेळी जिल्हा प्रशासन विरुध्द पोलिस विभाग यांच्यात मैत्रीपूर्ण फुटबॉल सामना झाला. या प्रदर्शनीय सामन्यात पोलिस विभाग संघ विजयी झाले. या सामन्यात पंच म्हणून योगेश कुभांर, किरण मिस्तरी, जितेंद्र ठाकरे यांनी काम पाहिले. या स्पर्धेला शहरातील विविध शाळांचे खेळाडू, नागरिक यांची उपस्थिती होती. आयोजन समितीतर्फे सर्व मान्यवरांचे फुटबॉल देवून स्वागत करण्यात आले. माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर, जिल्हा क्रीडाधिकारी घनश्याम राठोड, उपअधीक्षक विजय सोनवणे, पोलिस निरीक्षक किशोर नवले, अरमान तडवी, गणेश न्यायदे, ईश्वर गावीत, योगेश सोनवणे, धर्मेश बर्वे, सुनिल मोरे, रोहिदास पवार, राकेश वसावे, क्रीडाधिकारी संदीप ढाकणे, गौतम साळवे, मिलिंद वेरुळकर, मुकेश बारी, महेंद्र काटे आदींनी संयोजन केले.
मैंदानावर अधिकाधिक वेळ व्यतीत करा
विद्यार्थी, तरुण आणि नागरिकांनी मैदानावर अधिकाधिक वेळ व्यतित करुन व्यायाम करावा. फुटबॉलसारखे खेळ करुन स्वत:ला तंदुरुस्त ठेवावे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी येथे केले. देशात होणार्या जागतिक युवा फुटबॉल फिफा करंडक स्पर्धेच्या निमित्त महाराष्ट्र फुटबॉल मिशन 1 मिलियन हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने आज शालेय शिक्षण व युवक कल्याण मंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यात फुटबॉल खेळून एक जागतिक विक्रम/लिमका बुक ऑफ रेकॉर्ड होण्याकरीता फुटबॉल सामन्याचे आयोजन पोलिस कवायत मैदानावर करण्यात आले होते. जिल्हा प्रशासन व पोलिस विभाग यांच्यात हा सामना झाला. या सामन्याचे उदघाटन पालकमंत्री श्री. रावल व राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. हीना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलिस अधीक्षक संजय पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवाडे उपस्थित होते.
नवापूर येथे सेल्फी पॉईंट
नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र एक मिलियनसाठी श्री शिवाजी हायस्कुलचा मैदानावर सेल्फी पोईट बनवुन मान्यवरांचा हस्ते उद्घाटन करण्यात आलेे. क्रिडा शिक्षकांनी विद्यार्थाची टिम बनवुन आजचा या महाराष्ट्र फुटबॉल मिशन वन मिलियमचे उद्घाटन मोठ्या उत्साहात व फुटबॉलमय वातावरणात संपन्न झाले. यावेळी संचालक केशव पाटील, भरत पाटील, नगरसेवक अजय पाटील,नगरसेविका ज्योती कलाल , प्राचार्य अनिल पाटील, उपमुख्याध्यापक विनोद पाटील ,उपप्राचार्य एस आर पहुरकर, पर्यवेक्षक प्रविण पाटील,भरत पाटील ,हरीश पाटील ,कमल कोकणी आदि उपस्थित होते. कार्यक्रमासाठी क्रीडा शिक्षक राजेंद्र साळुंखे ,संग्रामसिंग राजपुत,मंगलदास पाटील,सतिष लाड,ऱाजेश पाटील यांनी परिश्रम घेतले व रेफरी म्हणुन किरण चौधरी,सुनील बंजारा यांनी काम पाहीले.