नवी दिल्ली – भारतात सुरु आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोना रुग्णांचे रोज नवनवे उच्चांक गाठले आहे. भारतातील ही परिस्थिती पाहता अमेरिकेने आपल्या नागरिकांना तात्काळ भारत सोडून पुन्हा मायदेशी परतण्यास सांगितलं आहे. अमेरिका सरकाने आपल्या नागरिकांनी करोनाच्या संकटात शक्य तितक्या लवकर भारत सोडण्यास सांगितलं आहे.भारत आणि अमेरिकेमध्ये सध्या १४ विमानं सुरु आहेत.