नागरीकांनी संधी दिल्यास विकासासाठी अधिक भर देणार

0

चोपडा । जिल्हा परिषद निवडणूक मी दुसर्‍यांदा लढवत असून माझा संपूर्ण कुटुंब सुरूवातीपासुन काँग्रेसचा निष्टावंत कार्यकर्ते म्हणून काम करीत असून सातत्याने करणार आहे. आम्ही एकनिष्ठ असल्यामुळेच पक्षाने अडावद-धानोरा गटासाठी सर्वसाधारण जागेवर उमेदवारी मिळालेली आहे. त्यानुसार निवडणूक लढवत आहे. गेल्या 10 वर्षापूर्वी याच गटातुन निवडणूक लढवून अल्पशा मतांनी पराभव झाला होता. मात्र त्यावेळीही सुद्धा मतदारांनी भरभरून प्रेम दिले होते. असेच प्रेम व साथ यावेळी देखील मला मिळत आहे. जि.प.व प.स.पचंवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची आघाडी असल्याने या गटातील 11 गावांमधील नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. नागरीकांनी मला कामाची संधी दिल्यास विकास कामांसाठी अधिक भर देणार असल्याची माहिती अडावद-धानोरा गटासाठीचे कॉग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील यांनी जनशक्तिशी बोलतांना सांगितले.

विविध विकास कामे करण्यासाठी कटिबद्ध

ग्रामीण भागाच्या खरा विकासाचा पाया म्हणून जिल्हा परीषदकडे मिनी मंत्रालय म्हणून बघितले जाते. जिल्हा परीषदेच्या निधीच्या माध्यमातून शेती शिवारात शेत रस्ते, गटातील गावामंध्ये जाणारे रस्ते, जि.प.च्या शाळांच्या झालेली दुरावस्था त्या दुरुस्त करणे, विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी शुद्धजल योजना व शौचालय, शिक्षक कमी असल्यास त्यांची रिक्त जागा भरणे, अडावद-धानोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची गैरसोय होणार नाही म्हणून दर आठवड्यात भेटी देऊन योग्य सुविधा उपलब्ध करणार, रुग्णांना योजनेच्या खरा लाभ दिला जातो का अशा समस्या जाणुन घेणार, या गटात सर्व प्रथम महिलांसाठी शौचालय बांधुन महिलांना खरा न्याय मिळवुन देणार, जि.प.च्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या अडीअडचणी सोडवणार व शेतकर्‍यांना शेती उपयोगी अवजारांचा विविध योजना मिळवुन देणार, आदिवासी समाजासाठी समाज कल्याण योजनेच्या लाभ लोकांपर्यंत पोहचविणार गावा-गावामंध्ये काँक्रिटीकरण करणे, गटारी नविन बनविणे आदी योजनांच्या लाग मिळवुन कामांना प्राधान्य देणार आहे.

नागरीकांची सेवा करण्यासाठी तत्पर राहणार

सर्व साधारण जागेसाठी मला पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संदीप भैय्या पाटील यांनी उमेदवारी देऊन माझ्यावर जो विश्वास ठेवून अडावद-धानोरा गटातील अडावद, धानोरा, मोहरद, ईच्छापुर, चांदण्या तलाव, पानशेवडी, बिडगांव, कुड्यांपाणी, वरगव्हाण, शेवरे, खर्डी, लोणी, पंचक, बढई, बढवाणी, खंडने आदी पाड्या वस्त्यांची सेवा करण्याची संधी देऊन मी तन मन धनाने नागरीकांचे सेवा करण्यास तत्पर राहिल. माझे जेष्ठ बंधु चंद्रशेखर युवराज पाटील (काळु दादा) यांनी पक्षाची एकनिष्ठ सेवा करून त्यांनी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष, जिल्हा सरचिटणीस, कृउबा समिती संचालक तर तज्ञ संचालक म्हणून चोसाकावर काम करून पक्षाचे विविधपदे भुषविले आहे. सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पक्ष बळकट करण्याचे सातत्याने काम करीत आहे. माझे बंधु पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यामुळेच त्यांच्या आशिर्वादाने मला उमेदवारी मिळाली आहे. या परीसरात माझे जेष्ठ बंधु चंद्रशेखर पाटील यांचा तगडा जनसंपर्क असल्याने त्याच्या देखील फायदा मला मिळणार आहे.