शेंदूर्णी – ग्रामपंचायत बरखास्त करून नव्याने नगरपंचायत स्थापना करण्यात आली असून राज्य सरकारतर्फे नव्याने स्थापन झालेल्या शेंदूर्णी नगरपंचायतीस नागरी सुविधा पुरविण्यासाठी “विशेष अनुदान निधी” अंतर्गत २ कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्या संबंधीचा खर्चाच्या अटीस आधीन राहून राज्यपाल यांच्या सहीने अध्यादेश काढण्यात आला आहे. राज्यातील नागरपंचायतींना सन २०१८/१९ करीता नव्याने स्थापन केलेल्या नागरपंचायतींना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य या योजनेअंतर्गत रु.९५.६८ वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेण्यात आला आहे. सदर शासन निर्णयामधील नागरपंचायतींना निधी “अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर” वितरीत करण्याची बाब विचाराधीन होती त्या संबंधी शासन निर्णय “विशेष अनुदान”म्हणून शेंदूर्णी नागरपंचायतींस २ कोटी निधी देण्यास मान्यता देण्यात आली आहे त्या संबंधीचा आदेश राज्यपाल यांच्या सहीने काढण्यात आला असल्याची माहिती तसेच शेंदूर्णी नगरपंचायतीस इतरही अनुदान मिळणार असल्याचे माहिती नगरपंचायत प्रशासक जामनेर तहसीलदार नामदेव टिळेकर व प्रभारी मुख्याधिकारी राहूल पाटील यांनी दिली आहे.