नागादेवी आदिवासी पाड्यावरील गुराख्याची आत्महत्या

यावल : तालुक्यातील सावखेडासीम जवळील नागादेवी आदिवासी पाड्यावरील वस्तीतील 15 वर्षीय मुलाने वनक्षेत्रात झाडाला गळफास घेतला. शनिवारी घडलेल्या घटनेप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. बन्सीलाल खुमान पावरा (15) असे मयताचे नाव आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
बन्सीलाल हा गुरे-ढोरे चारायचा. शुक्रवारी वनक्षेत्रात गुरे चराईसाठी गेला असता परत न आल्याने शोध घेतला असता शनिवारी गळफास घेतल्याची घटना उघडकीस आली. सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी, हवालदार राजेंद्र पवार यांनी भेट दिली. जागेवरच डॉ.गौरव भोईटे यांनी शवविच्छेदन केले. यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नेंद करण्यात आली असून बन्सीलाल पावरा या मुलाने आत्महत्या का केली ? याची माहिती कळू शकली नाही.