यावल तहसील प्रशासनाला निवेदन ; लोकप्रतिनिधींच्या भूमिकेने संताप
यावल:- नागादेवी पाझर तलावाची दुरस्ती रखडलेल्यान तालुक्यातील 11 गावातील संतप्त शेतकर्यांनी यावल तहसील कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन दिले.
आमदार, खासदार व मंत्र्यांनी दिलेले आश्वासन पोकळ ठरल्याने संतापही व्यक्त करण्यात आला. यंदा अत्यल्प झालेल्या पावसाने परीसरातील विहिरींची जलपातळी खालावली आहे. त्या पार्श्वभूमीवर नागादेवी पाझर तलावाची दुरुस्ती मागणी तशी 2006 पासून होत असतानाही दखल घेण्यात न आल्याने सौखेडासीम, नायगाव, चुंचाळे, बोराळे, दहिगाव, महेलखेडी, कोरपावली, मोहराळा, हरीपूरा, विरावली, नावरे या गावच्या शेतकर्यांनी यावल बसस्थानक ते तहसील कार्यालयापर्यंत पदमोर्चा काढत प्रशासनाला निवेदन दिले.