नाग क्षेपणास्त्राच्या पोखरणमध्ये चाचण्या

0

नवी दिल्ली । पाकिस्तानकडून वारंवार होत असलेल्या शस्त्रसंधींच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय लष्करानेे राजस्थानमधील पोखरण सीमेवर रणगाडाभेदी नाग क्षेपणास्त्राच्या चाचण्या घेण्यास सुरुवात केली आहे. डीआरडीओने तयार केलेल्या ई मालिकेतील रणगाडाविरोधी नाग क्षेपणास्त्राच्या आणखी तीन दिवस चाचण्या घेण्यात येणार आहे. पाकिस्तानच्या सीमेलगत असणार्‍या पोखरण फायरिंग रेंजवर होत नाग क्षेपणास्त्राची चाचणी भारतीय लष्कराच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. याच फायरिंग रेंजवर अमेरिकेकडून आयात करण्यात आलेल्या यूएव्ही हेवित्झर तोफांचीही चाचणी घेण्यात येत आहे. नाग क्षेपणास्त्राच्या चाचणीच्या वेळीस डीआरडीओ आणि लष्करातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मागील वर्षी बिकानेरमधील फायरिंग रेंजमध्ये या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी उच्च तापमानात या क्षेपणास्त्रात काही त्रुटी सापडल्या होत्या. गेल्या वर्षी या क्षेपणास्त्राची मारक क्षमता चार किलोमीटर इतकी ठेवण्यात आली होती. यावेळी ती तीन किलोमीटर करण्यात आली. गेल्यावर्षी या क्षेपणास्त्रात लावण्यात आलेली इमेजिंग इंफ्रा रे सिकर मार्गदर्शकप्रणाली उच्च तापमानात कुचकामी ठरली होती. त्यामुळे यंदा परत या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. या क्षेपणास्त्रासाठी 350 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.