भोसरी : तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेले आणि विविध कारणांनी सतत चर्चेत राहणारे भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दहीहंडीच्या उत्सावात आमदार लांडगे यांनी डान्स करत गोविंदाना हंडी फोडण्यासाठी प्रोत्साहन दिले. दादांचा डान्स केलेला ‘व्हिडीओ’ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला असून भोसरी परिसरात त्याची जोरदार चर्चा सुरु आहे. भोसरीतील भैरवनाथ कबड्डी संघाच्यावतीने दहीहंडीचे आयोजन केले होते. या दहीहंडीच्या कार्यक्रमात आमदार दादादेखील सहभागी झाले होते. दहीहंडीचा जल्लोष वाढत चालला होता. तरुणाई डिजेच्या तालावर नाचण्यात दंग झाली होती. आमदार दादांनीदेखील डान्स करण्यास सुरुवात केली. तरुणांमध्ये जल्लोष भरला. दादांनी डान्स करत गोविंदाना प्रोत्साहन दिले. आमदार दादा हे तरुणांच्या गळ्यातील ताईत असून, तरुणांमध्ये त्यांची मोठी क्रेझ आहे. दादांचा डान्स केलेला ‘व्हिडीओ’ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला असून भोसरी परिसरात त्यांच्या डान्सची जोरदार चर्चा सुरु आहे.