समाजबांधवांनी केली गर्दी
पिंपरी : फेथ फाउंडेशनच्यावतीने बायबलवर आधारित ‘वधस्तंभवार खिळलेला येशूचा जीवन प्रवास’ हे नाटक तयार करण्यात आले. या नाटकात दाखविण्यात आलेल्या पॅशन ऑफ ख्राईस्ट या धार्मिक मराठी महानाट्यात आबालवृद्ध अक्षरश: हरकून गेले. मासुळकर कॉलनी येथील टेल्को मैदानावर शनिवारी सादर करण्यात आलेल्या महानाट्यात बायबलमधील अनेक धार्मिक प्रसंग कलाकारांनी जिवंत केले. मरण यातना सहन करूनही प्रभू येशूने शांतता, मानवता व प्रेमाचा संदेश या नाटिकेद्वारे देण्यात आला.
शहरात प्रथम सादर करण्यात आलेल्या ख्रिस्ती धार्मिक जिवंत देखावा पाहण्यासाठी समाजबाधंवांनी गर्दी केली होती. या नाटिकेत पुणे, नाशिक, मुंबई, पिंपरी चिंचवड येथील 40 कलाकारांचा सहभाग घेतला होता. तत्कालिन वेशभूषा, उत्कृष्ट ध्वनी व प्रकाश योजनेने सादर करण्यात आलेल्या नाटिकेने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. यावेळी संस्थाध्यक्ष ब्रदर नोएल व्हॅन्हॅलट्रन, बिशप मायकल नाडार, सिस्टर एलिन व्हॅन्हॅलट्रन, दि युनायटेड चर्च ऑफ ख्राईस्ट, पास्टर सुधीर पारकर, पास्टर बन्यामीन काळे, डेव्हिड काळे, फ्रान्सिस गजभिव उपस्थित होते. ब्रदर सुबोध जाधव यांनी सुत्रसंचालन केले. आभार पास्टर रमेश साळवी यांनी मानले.