नाट्यगृहाचे 1 जानेवारीला लोकार्पण

0

जळगाव । शहरात अद्ययावत नाट्यगृहाचे लोकार्पण 1 जानेवारी 2018 ला होईल अशी घोषणा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी पुरूषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकाकिंका स्पर्धेच्या उद्घाटना प्रसंगी केली. ही स्पर्धा प्रतिष्ठेची असून यात युवकांनी सहभागी व्हावे असेही त्यांनी आवाहन केले. महाराष्ट्र कलोपासक (पुणे) आणि केसीई सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त मूळजी जेठा महाविद्यालयाच्या नाटयशास्त्र विभागातर्फे आयोजीत पुरूषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा शनिवारी सुरू झाली. भैयासाहेब गंधे सभागृहात जिल्हाधिका-यानी घंटानाद करून उद्घाटन केले. मंचावर अध्यक्षस्थानी केसीई संस्थेचे सहसचिव किरण बेंडाळे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार मिलिंद कुलकर्णी प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी कलोपासक पुणेचे राजेंद्र नागरे परिक्षक श्रीपाद देशपांडे अजय धवने गिरीष केमकर संस्थेचे सभासद शशिकांत वडोदकर चारूदत्त गोखले उपस्थित होते.

ज्येष्ठ पत्रकार मिलिंद कुलकर्णी म्हणाले की मी मूल्जियन्स असून पुरूषोत्तक करंडक स्पर्धेची परंपरा खंडित न होता. मूजे महाविद्यालयाने त्याची घौडदौड कायम ठेवली याबद्दल आनंद व्यक्त केला. तर किरण बेंडाळे म्हणाले की मूळजी जेठा महाविद्यालय हे विदयार्थ्यांना केवळ शैक्षणिक सुविधा देत नाही तर त्यासोबत त्यांच्या व्यक्तीमत्वाचा विकासाकरीता विविध उपक्रम राबवित आहे. जलश्री विविधता संशोधन केंद्र एकलव्य क्रिडा संकुल या विभागाद्वारे उल्लेखनिय उपक्रम सुध्दा राबविते असेही सांगितले.

कलोपासकचे मानले आभार
प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांनी शिस्तबध्दपणे कला सादर करावी असे आवाहन केले.राजेंद्र नांगरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आयोजकांमध्ये केवळ केसीई संस्थेनेच स्पर्धेसाठी आर्थिक मदत केली असे नमूद करीत कलोपासकच्या हाकेला केसीईने मान दिल्याबद्दल आभार मानले. जिल्हाधिकारी निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांमधील कलावंताला साद घालण्याचे काम पुरूषोत्तम करंडक स्पर्धा करते असे सांगत महाविद्यालयीन जीवनात नाटय स्पर्धामध्ये भाग व प्रोत्साहन देण्याचे काम केल्याची आठवण त्यांनी करून दिली.

अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण
सूत्रसंचालन व आभार प्रा.योगेश महाले यांनी मानले. स्पर्धा आयोजनासाठी शशिकांत वडोदकर नाटयशास्त्र विभागाचे प्रमुख हेमंत पाटील प्रा.जुगलकिशोर दुबे प्रा.विश्वजित चौधरी प्रा.कपील शिंगाणे प्रा.प्रसाद देसाई प्रा.स्वप्ना लिंबेकर प्रा.योगेश महाले, डि.डी.झोपे प्रा.विजय लोहार प्रा.अविनाश काटे राकेश वाणी यांच्या अध्यक्षतेखाली समित्या परिक्षण घेत आहे. खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीने शनिवारी 75 व्या वर्षात पदार्पण केले याचे औचित्य साधत या पुरूषोत्तम करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.