नाडगावच्या जागा मालकांना माजी मंत्र्यांच्या हस्ते धनादेश वितरण

0

नाडगाव रेल्वे ओव्हर ब्रिजसाठी रेल्वे प्रशासनाकडून भूसंपादन

बोदवड- मध्य रेल्वेच्या बोदवडस्टेशन जवळील नाडगाव येथे बोदवड-मुक्ताईनगर रस्त्यावर असलेल्या रेल्वे गेटमुळे वाहतुकीची समस्या निर्माण होवून वाहनधारकांना मनस्ताप सोसावा लागत होता. ही समस्या सुटण्यासाठी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वे विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर रेल्वे ओव्हर ब्रिज मंजुरी मिळाली तर या कामासाठी भूसंपादन करण्यात आले. भूसंपादनात जागा गेलेल्या शेतकर्‍यांना मोबदल्यापोटी गुरुवारी एक कोटी 67 लाख रुपये रकमेच्या धनादेशाचे वितरण माजी महसूल कृषी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
तहसीलदार रवींद्र जोगी, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, भाजप तालुकाध्यक्ष भागवत टिकारे, दूध संघ संचालक मधुकर राणे, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य अनिल खंडेलवाल, बाजार समिती संचालक रामदास पाटील, माजी तालुकाध्यक्ष अनिल पाटील, नगरपालिका गटनेते कैलास चौधरी, बाजार समितीचे माजी सभापती अनिल वराडे, पंचायत समिती सभापती गणेश पाटील, जिल्हा परीषद सदस्य भानुदास गुरचळ, पंचायत समिती उपसभापती रुपाली राणे, पंचायत समिती सदस्य किशोर गायकवाड, देवराम सुपे उपस्थित होते.