नाणार प्रकल्प कार्यालयात मनसेचा राडा

0

मुंबई : नाणार प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत कोकणात होऊ देणार नाही, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी मुलुंड येथील सभेत दिल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी ताडदेव येथील नाणार रिफायनरी प्रकल्प कार्यालयाची तोडफोड केली. नाणार प्रकल्पासाठी काम करत असलेल्या रिफायनरी अ‍ॅण्ड पेट्रो-केमिकल लिमिटेडचे कार्यालय ताडदेव येथे आहे.

मनसेच्या 5 ते 6 कार्यकर्त्यांनी या कार्यालयात घुसून तोडफोड केली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यात कार्यालयातील सुरक्षा रक्षकांना मनसे कार्यकर्ते शिवीगाळ करत असल्याचेही ऐकू येत आहे. रत्नागिरीच्या नाणार प्रकल्पाचेच हे कार्यालय आहे की नाही, याची खातरजमा मनसे कार्यकर्त्यांनी तेथील कर्मचार्‍यांकडे केली आणि नंतर तोडफोड केली.