मुंबई-नाणार प्रकल्पाला शिवसेना आणि नारायण राणे यांनी विरोध दर्शवला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्पासाठी ठाम भूमिका घेतली आहे. नाणार प्रकल्पाला विरोध होत आहे. मात्र हा विरोध चर्चेने सोडवू, असे सांगतानाच नाणार प्रकल्प महाराष्ट्रात येणे ही भाग्याची गोष्ट आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
शिवसेनेचा विरोध चर्चेने सोडवू
गुरुवारी मुंबईत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्पाचे समर्थन केले. ‘मी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे आभार मानतो. सगळ्यात मोठी रिफायनरी ते महाराष्ट्रात आणत आहेत. या प्रकल्पामुळे रोजगाराची निर्मिती होणार असून नाणार प्रकल्प महाराष्ट्रात येणे ही भाग्याची गोष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.
रिफायनरी महाराष्ट्रात व्हावी, अशी आमची भूमिका आहे. या प्रकल्पाला गैरसमजातून विरोध होत असून जे विरोध करतात त्यांनी चर्चेद्वारे शंका दूर करावी, हा प्रकल्प राज्याच्या फायद्याचा आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, असे ठणकावले होते. नाणारला शिवसेनेचा विरोध असतानाही केंद्र सरकारने परस्पर सामंजस्य करार केल्याने शिवसेना भाजपावर नाराज आहे. तर भाजपाचे सह्योगी खासदार नारायण राणे यांनीही नाणार प्रकल्पाची एकही वीट रचू देणार नाही, असा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा नाणार प्रकल्पाचे समर्थन के