नाताळनिमित्त रेल्वे प्रवाशांसासाठी रेल्वेतर्फे विशेष रेल्वेगाड्या

0

मुंबई-नागपूरसह अजनी-थिविम व हापा सांत्रागाच्छी जाणार्‍या प्रवाशांची होणार सोय

भुसावळ- नाताळनिमित्त असलेल्या सुट्या व रेल्वे गाड्यांना असलेली गर्दी पाहता रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मुंबई-नागपूरसह अजनी-थिविम व हापा सांत्रागाच्छी दरम्यान रेल्वेच्या विशेष गाड्या सुरू केल्या असून या गाड्यांच्या प्रत्येकी येऊन-जावून तीन फेर्‍या होणार असल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई-नागपूर साप्ताहिक विशेष गाडी
गाडी क्रमांक 02031 मुंबई-नागपूर विशेष गाडी 22 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान दर शनिवारी सुटेल. ही गाडी प्रत्येक शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून रात्री 12.20 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी दुपारी 1.55 वाजता नागपूर येथे पोहोचेल तसेच गाडी क्रमांक 02032 साप्ताहिक विशेष गाडी 23 डिसेंबर ते 6 जानेवारीदरम्यान प्रत्येक रविवारी नागपूर येथून दुपारी तीन वाजता सुटून दुसर्‍या दिवशी सायंकाळी 6.10 वाजता छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीला दादर, कल्याण, इगतपुरी, नासिक रोड, जलगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, पुलगाव तसेच वर्धा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

अजनी-थिविम साप्ताहिक विशेष गाडी
गाडी क्रमांक 01119 अजनी-थिविम साप्ताहिक विशेष गाडी 24 डिसेंबर ते 7 जानेवारी दरम्यान दर सोमवारी सुटणार आहे. ही गाडी दर सोमवारी अजनीहून रात्री 7.50 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी रात्री 10.30 वाजता थिविम येथे पोहोचेल तर गाडी क्रमांक 01120 साप्ताहिक विशेष गाडी 25 डिसेंबर ते 8 जानेवारी दरम्यान दर मंगळवारी थिविम येथून रात्री 11 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी रात्री 10.50 वाजता अजनी येथे पोहोचेल. या गाडीला कुडाळ, कनकवली, रत्नागिरी, चिपळून, रोहा, पनवेल, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

हापा-सांत्रागाच्छी दरम्यान विशेष गाडी
गाडी क्रमांक 02834 सांत्रागाच्छी-हापा विशेष साप्ताहिक गाडी 14 ते 28 डिसेंबरदरम्यान प्रत्येक शुक्रवारी सांत्रागाच्छी येथून रात्री 9.5 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी रविवारी सायंकाळी 6.35 वाजता सांत्रागाच्छी येथे पोहोचेल. गाडी क्रमांक 02833 हापा-सांत्रागाच्छी विशेष गाडी 17 ते 31 डिसेंबरदरम्यान प्रत्येक सोमवारी सकाळी 10.40 वाजता सुटून तिसर्‍या दिवशी पहाटे 5.45 वाजता सांत्रागाच्छीला पोहोचेल. या गाडीला राजकोट, सुरेंद्रनगर, विरागम, अहमदाबाद, नडियाद, बडोदा, आनंद, भरूच, सुरत, नंदुरबार, अमळनेर, जलगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर, बिलासपूर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर, खरगपुर आदी रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला.