राज्यात भाजपाची सत्ता आणण्यात भाऊंचा सिंहाचावाटा : आरोपानंतर स्वतःहून दिला राजीनामा
मुक्ताईनगर- पद असले की गर्दी होते व पद नसले ती गर्दी ओसरते, असा राजकीय अनुभव आहे मात्र नाथाभाऊ त्याला अपवाद आहेत. राजकारण आपल्याला आवडत नाही कारण आपली त्याविषयी धारणा नव्हती मात्र योगा-योगाने आपण राजकारणात आलो अन् सुशिक्षीत लोकांनी आता राजकारणात यायला हवे, असे आता वाटू लागल्याचे आमदार संजय सावकारे म्हणाले. नाथाभाऊंवर अनेक आरोप झाले व त्यांनी स्वतःहूनच राजीनामा दिला त्यामुळे त्यांना आता पदही नको, असे ते म्हणत आहेत. भगवान श्रीकृष्णाने वाईट प्रवृत्तींचा नाश केला मात्र खडसेंनी असा काय गुन्हा केला? अशी त्यांना शिक्षा मिळाली ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करीत मिडीयाने आता त्यांना न्याय द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. स्थानिक पत्रकार हे नेहमीच राजकारण्यांसोबत असतात मात्र पाठवलेली बातमी वरीष्ठ स्तरावर कशी बदलते? याबाबत आपल्याला अनुभव आल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यात भाजपाची जी सत्ता आली त्यात नाथाभाऊंचा सिंहाचा वाटा असून आता त्यांना न्याय मिळायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यामुळे प्रलंबित प्रश्न सुटतील, अशी अपेक्षा व्यक्त करीत चंद्रकांत पाटलांनी हा प्रश्न वरपर्यंत मांडायला हवी, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.