धरणगाव । सद्गुरू जीवनात परिवर्तन घडवून आणतात. त्यांच्या विचारांनी जगण्याला दिशा प्राप्त होते. पू. सद्गुरु नानासाहेब धर्माधिकारी यांनी अनेकांना मार्ग दाखविला असून त्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणली आहे. शिस्त, समर्पण आणि निस्वार्थ सेवा ही समर्थ बैठकीची व्यापक भुमिका आहे. अश्या महनीय व्यक्तीचे सतत स्मरण होत रहावे यासाठी धरणगांव न.पा.त्यांची प्रतिमा सभागृहात लावली असून ती आम्हाला निस्वार्थ सेवेची प्रेरणा देत राहिल असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. प्रतिमा अनावरण समारंभात ते बोलत होते. त्यांची शिस्तबध्द उपस्थिती चर्चेचा विषय होती.
नगरपालिका सभागृहात प्रतिमा अनावरण
याप्रसंगी प्रमोद मुळे यांनी प्रास्ताविक केले. रेवदंडा येथून काही मोजक्या लोकांनी सुरु केलेली ही समाज प्रबोधनाची चळवळ आज महासागरासारखी विस्तारली असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर प्रमोद लोखंडे, संजय विसपुते, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी समर्थ सेवकांच्या निस्वार्थ सेवेचा यथोचित गौरव केला. रामभाऊ घोळ यांनी समयोचित भाषणे केली. अनावरण प्रसंगी व व्यासपिठावर डि. जी. पाटील, नगराध्यक्ष सलिम पटेल, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, ज्ञानेश्वर महाजन, प्रमोद पाटील, सचिन पवार, प्रेमराज पाटील, सुरेखा महाजन, मुकुंद नन्नवरे, सुभाष जाधव, बी.डी.सोनवणे, कैलास माळी, पप्पू भावे, सुनिल चौधरी, वासुदेव चौधरी, सौ. अंजली विसावे, अराधना पाटील, पार्वताबाई पाटील, सौ. कल्पना महाजन, सौ. मंदा धनगर, भागवत चौधरी, सौ. उषाताई वाघ, सौ. संगीताताई मराठे आदी उपस्थित होते.
यशस्वितेसाठी यांनी केले प्रयत्न
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामभाऊ घोळ, प्रमोद मुळे, संजय विसपुते, मोहन पाटील, विनोद माळी, प्रमोद पाटील, वृंदाताई तिल्हेकर, विकास पाटील, विजय माळी, प्रमोद लोखंडे, रामकृष्ण, पाटील, मनोज तायडे, प्रविण पाटील, रेखा लोखंडे, शोभाताई बेंडाळे, छायाताई पाटील, चित्राताई सोनार, कविता पाटील, शितल मराठे, येवले, वृंदाताई, शोभा मराठे, आदी सेवेकरींनी परीश्रम घेतले. सूत्रसंचलन विवेक चौधरी यांनी तर आभार प्रदर्शन विश्वनाथ पाटील यांनी केले.