जागतिक आरोग्य दिनानिमित्त केले आयोजन
सांगवी : शरीर निरोगी राहण्यासाठी चालणे हा एक उत्तम व्यायाम आहे. त्या अनुषंगाने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून नाना काटे सोशल फाउंडेशन व समरीटन्सच्या संयुक्त विद्यमाने पिंपळे सौदागर येथे तीन किलोमीटर व पाच किलोमीटरसाठी वॉक फॉर गुड हेल्थ उपक्रम घेण्यता आला. या वॉक फॉर गुड हेल्थची सुरुवात रोझ आयकॉन शेजारील महापालिकेच्या मैदानातून झाली. पुढे शिवार चौक, कोकणे चौकमार्गे रहाटणी चौकात समारोप झाला. वॉक फॉर गूड हेल्थमध्ये सहभागी होणार्यांकडून देणगी गोळा करून स्नेहवन या संस्थेला देण्यात आला. स्नेहवन ही विश्वस्त संस्थेत दुष्काळग्रस्त शेतकर्यांची लहान मुले, आत्महत्याग्रस्त शेतकर्यांची शिक्षणापासून वंचित असलेली मुले यांच्या वास्तव्याचा व शिक्षणाचा संपूर्ण खर्च केला जातो. आयटीमधील नोकरी सोडून अशोक देशमाने हे स्नेहवन या संस्थेची स्थापना केली आहे. या गुड वॉकमध्ये नगरसेवक नाना काटे, रोझलँड रेसिडेन्सीचे संचालक संतोष मसकर, आनंद दप्तरदार, शिवार गार्डनचे नंदकुमार काटे, संदेश काटे-पाटील, काळूराम कवितके, गोविंद वलेकर, किरण क्षीरसागर, ट्रस्टचे मोहन मुद्दाना, संदेश पुजारी, श्रीनिवास हाके यांनी सहभाग घेतला.