पालिक उद्यान प्रशासनाचे दुर्लक्ष
पिंपरी : पिंपरी परिसरातील मासुळकर कॉलनी परिसरातील नाना-नानी पार्कचे जागोजागी कुंपण तुटले आहे. त्यामुळे उद्यानात गैरप्रकार होत असून याचा त्रास उद्यानात येणार्या लहान मुलांना व वृद्धांना होत आहे. त्यातच या उद्यानाच्या पाठीमागच्या बाजूने तारकुंपण तोडून लालटोपीनगर येथील रहिवाशांनी पाया वाटा तयार केल्या आहेत. यामुळे उद्यानात मध्यपी, गर्दुले, व टपोरींनी थैमान घातले आहे. उद्यानात लहान मुलांची खेळणे असल्याने मोठ्या संख्येने येथे मुलांची गर्दी असते. तर उद्यानातील एका सभागृहात ज्येष्ठ नागरिकांचे विविध कार्यक्रम होतात. यामुळे रॉक गार्डन’ नेहमीच गजबजलेले असते.
हे देखील वाचा
स्वच्छतागृहात पाणी नाही
उद्यानात सध्या उपलब्ध असलेल्या स्वच्छतागृहात पाण्याचा पत्ता नसून यामुळे उद्यानाच्या काही भागात दुर्गंध पसरलेली आहे. नवीन स्वच्छतागृहाची निर्मिती करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र काम कासवगतीने होत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. गेले कित्येक दिवसांपासून उद्यानातील मागच्या बाजूने रस्ता पाडला असून उद्यानात सर्रास अन्नधान्य, कपडे सुकवले जात आहे. यामुळे उद्यानाचे विदृपीकरण होत आहे. तर काही वेळा सर्रास मद्यपी पार्टी करत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. यामुळे उद्यान विभागाचे उद्यानावर किती लक्ष आहे. हे यावरुन दिसत आहे. उद्यानाला तीन सुरक्षा रक्षक, चार कर्मचारी उद्यानाची देखभाल करण्यासाठी आहेत. परिसर मोठा असल्याने संपुर्ण उद्यानावर लक्ष देणे सुरक्षा रक्षकांना त्रासदायक झाले आहे. तुटलेल्या कुंपनामुळे उद्यानाची रया जात असून यासंदर्भात अजूनही उद्यान विभागाला व संबधित ठेकेदाराला अजून जाग आलेली नाही.