जळगाव |
काही दिवसांपुर्वी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पंतप्रधान मोदींविरुद्ध बेताल वक्तव्य केले होते. या घटनेचे राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात होता. दरम्यान, जिल्हा महानगरतर्ङ्गे नाना पटोलेंच्या पुतळ्याला जोडे मारीत पुतळा दहन करुन निषेध करण्यात आला. तसेच पटोलेंवर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आली.
भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा व महानगर तर्फे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपातर्फे जिल्हाध्यक्ष महानगर दीपक सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात करण्यात आले. यावेळी नाना पटोलेंचा पुतळा दहन करीत निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष उज्वला बेंडाळे, जिल्हा सरचिटणीस नितीन इंगळे, उपाध्यक्ष अमित भाटिया, महिला आघाडी अध्यक्षा दिप्ती चिरमाडे, सरचिटणीस रेखा वर्मा, सरोज पाठक, सना खान, कार्यालय मंत्री प्रकाश पंडित, जिल्हा सह प्रसिद्धीप्रमुख धीरज वर्मा, ग्रामीणचे अरुण सपकाळे, गोपाल भंगाळे, राजू सोनवणे, जहांगीर खान, मंडळ अध्यक्ष केदार देशपांडे, सरचिटणीस संजय तिर्माले, आघाडी अध्यक्ष जयेश भावसार, लता बाविस्कर, दिपक बाविस्कर, युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे, मिलिंद चौधरी, राहुल लोखंडे, राहुल मिस्त्री, जयंत चव्हाण, विकी सोनार, शुभम बाबा, योगेश पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपने शहरातील घाणेकर चौकात आंदोलन करण्यात केले. यावेळी त्यांच्याकडून धिक्कार असो धिक्कार असो…नाना पटोलेंचा धिक्कार असो, या नानाच करायच काय.. खाली डोक वरती पाय.., मुर्दाबाद मुर्दाबाद नाना पटोले मुर्दाबाद अशा घाषणा दिल्या जात होत्या. त्यांच्या घोषणांनी संपुर्ण परिसर दणाणून गेला होता.