जळगाव- भडगाव तालुक्यातील वडगाव नालबंदी येथील माजी सरपंच मोरसिंग दल्लू राठोड यांच्या स्नुषा तसेच प्रा.सुदाम राठोड यांच्या पत्नी सोनी राठोड यांची पोलीस पाटीलपदी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे. सोनी राठोड ह्या सुशिक्षित महिला असून नालबंदी गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांच्या रूपाने एका महिलेला पोलीस पाटील पदाचा मान मिळाला आहे. त्यांचे माहेर शिरपूर तालुक्यातील खांबाळा येथील आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल ग्रामस्थ, आप्तेष्ट व बंजारा समाज बांधवांतर्फे अभिनंदन केले जात आहे.