पुणे-गृहनिर्माण आणि शहरी प्रकरण मंत्रालय भारत सरकार यांच्या मार्फत भारत स्मार्ट शहर पुरस्कार २०१८ अंतर्गत सर्वात नाविण्यपूर्ण आणि यशस्वी प्रकल्पांसाठी पुणे शहराची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती पुणे महानगर पालिका माहिती व जनसंपर्क अधिकारी संजय मोरे यांनी दिली.
यामध्ये उत्कृष्ट प्रशासन श्रेणी अंतर्गत पुणे महानगरपालिकेने नागरीकांना संवाद साधण्यासाठी पी.एम.सी केअर प्रकल्प, सामाजिक भूमिका श्रेणी अंतर्गत वंचित तरुणांना सक्षम बनविण्यासाठी शाश्र्वत उपजिविकेचे साधन म्हणून पुणे शहरात लाईट हाउस प्रकल्प उभारणे, स्मार्ट सिटी अभियांनातर्गत तयार पर्यावरण साठी स्थान निर्मिती प्रकल्प आणि नागरी पर्यावरणाअंतर्गत तयार सार्वजनिक सायकली शेअरिंग प्रकल्प यांचा समावेश आहे.