नवापूर । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने नाविन्यपूर्ण योजने अंतर्गत चार प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर केले असता प्रशासनाने उपयोजना महसुली अंतर्गत मान्यता दिली.बाजार समितीच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी मिळाली असून 99 लाख 65 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मधुकर नाईक यांनी दिली. येथील बाजार समितीने जिल्हा नियोजन समितीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात शेतकरी भुसार माल साठवणूक शेड बांधकाम करणे,बाजार समितीच्या मुख्य आवारास संरक्षण भिंत बांधकाम,स्वच्छता गृह बांधणे,बाजार समितीच्या मुख्य आवारात कॉन्क्रेटीकरण करणे,या प्रस्तावीत कामांसाठी नाविन्यपूर्ण योजनेतील चार प्रस्ताव सादर केले होते.
रावलांची जिल्हाधिकार्यांशी चर्चा
नवापूर तालुक्यातील शेतकर्यांना शेतमाल विक्रीकरिता बाजार आवारात पायाभूत सुविधा नसल्याकारणाने विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. सभापती मधुकर नाईक यांनी शेतमाल अनुज्ञाप्तीधरकांबरोबर वेळोवेळी सभा घेवून व्यापार्यांच्या समस्या समजून घेतल्या. त्याकमी लागणार निधी उभारण्या करिता आ.सुरूपसिंग नाईक यांना बाजार समितीच्या संचालक मंडळाचा वतीने विनंती केली होती. आ. सुरूपसिंग नाईक यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या अध्यक्षतेखाली व्यापारी सभा घेवून व्यापार्यांच्या अडचणी व समस्या समजावून घेतल्यात. याबाबत पालकमंत्री ना.जयकुमार रावल व जिल्हाधिकारी डॉ मल्लिनाथ कलशेठ्ठी यांच्याशी चर्चा करून निधी मंजूर करून घेतला.
विविध समस्यांचे निराकरण
शेतकर्यांच्या व व्यापार्यांचा समस्या सोडविण्याकामी सभापती मधुकर नाईक यांना आ.सुरूपसिंग नाईक,जिल्हाधिकारी डॉमल्लिनाथ कलशेठ्ठी जिल्हा उपनिबंधक एस. वाय. पुरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आदिवासी सहाकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक व माजी जिप अध्यक्ष भरत गावित यांच्या मार्गदर्शनाखाली सभापती मधुकर नाईक व संचालक मंडळ बाजार समितीच्या विकासात्मक कामांसाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. सभापती मधुकर नाईक यांच्या विशेष प्रयत्नांनी बाजार समिती नवापूर यांच्या मुख्य आवारात नवापूर येथील जागेवर असलेले एसटी महामंडळाचे आरक्षण काढून सदर जागा आता शेतकर्यांच्या हितासाठीच्या प्रस्तावित विकास कामाना उपयोगात आणता येऊ शकते सदर समस्या वर्षानु वर्ष प्रलंबित होती.