जळगाव – नाशिक परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेत जळगाव विभागाच्या संघाने घवघवीत यश संपादीत करून तिसरा क्रमांक पटकाविला
आहे. फुटबॉल व रिले पुरुष स्पर्धत गोल्ड पदक, हॉकी स्पर्धेत सिल्व्हर तर व्हॉलीबॉल स्पर्धेत महिला संघाने गोल्ड पदक प्राप्त केले आहे.
सर्व यशस्वी खेळाडूंचे पोलिस अधिक्षक दत्तात्रय शिंदे यांनी कौतुक केले आहे. धुळे येथे नाशिक परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच पार
पडल्या. यात जळगाव विभागाचा संघ देखील सहभागी झाला होता. त्यामध्ये व्हॉलीबॉल पुरुष व महिला स्पर्धेत जळगावच्या संघाला प्रथम
पारितोषिक मिळाले आहे. तसेच फुटबॉल स्पर्धेत देखील पुरुष संघाने प्रथम क्रमांकाने विजयी झाला आहे. गेल्या आठ वर्षापासून फुटबॉल
स्पर्धेत जळगाव विभागाने सतत गोल्ड पदक पटकाविले असून फुटबॉल स्पर्धेत रविंद्र सावळे, विकार शेख, अमोल जाधव, मनोज सुरवाडे,
तौसिफ शेख यांनी उल्लेखनिय कामगिरी केली. तसेच हॉकी स्पर्धेत संघाने सिल्व्हर तर ऍथेलॅटीक्स स्पर्धेतील रिलेमध्ये देखील
जळगावच्या संघाने गोल्ड पदक प्राप्त केले आहे. यावेळी प्रशिक्षक म्हणून समरत वाघ,शरीफ तडवी, सुनिल सौंदाणे, आरएसआय श्री.
धाडवड यांनी संघाला मार्गदर्शन केले.
Prev Post
Next Post