नाशिक-पुणे महामार्गावर अपघात; दोन जण ठार

0

संगमनेर : नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर कासारा-दुमाला गावच्या शिवारात ट्रक व कारच्या धडकेत झालेल्या अपघातात दोन जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत. आज शुक्रवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

भूषण दिलीप वाळेकर (३३), आर्यन जयंत सांत्रस (१४)अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. जयंत शामसुंदर सांत्रस, मोहिनी जयंत सांत्रस (४२), उषा शरद लोहारकर (६०), देवयानी भूषण वाळेकर (२३) हे चार जण जखमी झाले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक पंकज निकम, पोलीस हेड कॉँस्टेबल विजय खंडीझोड, पोलीस नाईक सचिन उगले आदींनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातातील जखमींना रुग्णालयात हलविले. भूषण वाळेकर व आर्यन सांत्रस यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कॉटेज रूग्णालयात नेण्यात आले असून जखमींवर संगमनेरातील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.