नाशिक फाटा येथे क्रेन कोसळली

0

पिंपरी : महामेट्रोचे काम नाशिक फाटा येथे सुरू असताना अवाढव्य क्रेन कोसळली. क्रेनमार्फत काम सुरू असताना फारशी वाहतूक वर्दळ नसल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

‘महामेट्रो’कडून पुणे मेट्रोचा पहिला टप्पा पिंपरी ते स्वारगेट असा आहे. त्यापैकी पिंपरी ते दापोडी हे काम सध्या जोमाने सुरू आहे. मेट्रोचे पिल्लर, वाय डक्ट, रनवेचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. प्रमुख चौकांमध्ये मेट्रोचे पिलर उभे करण्यासाठी जमिनीखाली खडक किती अंतरावर आहे, त्याचा पोत कसा आहे हे पाहण्यासाठी या अवाढव्य क्रेनच्या माध्यमातून खड्डे खोदण्यात येतात. त्यानंतर तेथे पिलर उभारले जातात. अशाच पद्धतीने नाशिक फाटा येथे काम सुरू असताना ही अवाढव्य क्रेन आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कोसळली. क्रेन हटवण्याचे काम मेट्रोकडून सुरू करण्यात आले.