नाशिक फाट्यावर मेट्रोचा पहिला व्हाया डक्ट साकार

0

पिंपरी-चिंचवड : पुणे मेट्रो प्रकल्पाचा पहिला व्ह्याया डक्ट सेगमेंट गुरुवारी साकार झाला. पुणे मेट्रो प्रकल्प पूर्ण होण्यासाठी व्हाया डक्ट उभारणे हे एक महत्वाचे पाऊल आहे. पुणे मेट्रोचा पहिला व्हाया डक्ट नाशिक फाट्याजवळ उभारण्यात आला आहे. प्री स्ट्रेसड सेगमेंटल बॉक्स गर्डर तंत्रज्ञांच्या माध्यमाने ह्या सेगमेंटची निर्मिती करण्यात आली. याचे वजन 45 टन इतके आहे. या सेगमेंटच्या लाँच करता 200 टन वजनाच्या क्रेनचा वापर करण्यात आला. सर्वसाधारणपणे 28 मीटर गर्डर करता दहा सेगमेंट वापरले जातात.

सेगमेंट तयार करताना त्याच्या गुणवत्तेबाबत काटेकोरपणे विविध चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यामध्ये ’अल्ट्रा सोनिक पल्स व्हेलॉसिटी टेस्ट’चा देखील समावेश आहे. ही चाचणी व्हाया डक्टच्या निर्मितीसाठी सर्वात महत्वाची समजली जाते. व्हायाडक्टच्या उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर मेट्रोचे रूळ बसवण्याचे काम सुरु होणार आहे.