नाशिक विभागीय बॉक्सींग स्पर्धेत भुसावळ क्ले बॉक्सींग क्लबच्या खेळाडूंचे यश

भुसावळ : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नाशिक विभागीय बॉक्सींग स्पर्धेचे 21 ते 23 दरम्यान लॉयन क्लबतर्फे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत शहरातील क्ले बॉक्सींग क्लबच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले. क्ले बॉक्सरांनी 21 सुवर्ण तर 15 रौप्य पदक पटकावले. अनिरुद्ध गाडके यांनी बेस्ट बॉक्सरचा किताब पटकावला तर मुलींमध्ये पियुसी मेढे हिने मोस्ट प्रोमोशन बॉक्सरचा किताब पटकावला. क्ले बॉक्सींगचे मुख्य प्रशिक्षक पवन शिरसाठ, सह प्रशिक्षक अनिल सपकाळे, लखन जंजाळे, क्ले बॉक्सींग संयोजक संदीप वाघ, अतुल महालकर आदींनी परीश्रम घेतले.