भुसावळ । कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र विषयाच्या तृतीय वर्ष आणि एम.ए.च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. एम.व्ही. वायकोळे उपस्थित होत्या तर प्रा. व्ही.जी. पाटील, उपप्राचार्य डॉ. एन.ई. भंगाळे, डॉ. ए.डी. गोस्वामी, प्रा. एस.टी. धूम, प्रा.डॉ. किरण वारके, प्रा. व्ही.ए. साळुंखे, प्रा. जे.पी. अडोकार उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या जीवनात निर्माण होणार्या विविध प्रसंगांना सामोरे कसे जावे, संकटाच्या वेळी कसे टिकून राहावे तसेच जीवनातील विविध पैलुंवर मान्यवरांनी प्रकाश टाकला. उपप्राचार्य भंगाळे यांनी महाविद्यालयीन जीवनातील दिवस हे शिदोरी म्हणून असतात तर उपप्राचार्य गोस्वामी यांनी स्पर्धा परिक्षेकडे वळण्याचा सल्ला दिला. व्ही.जी. पाटील यांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवावा व काळासोबत चलायला शिका, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. विभागातील विविध कार्यक्रमात सहभाग घेणार्या विद्यार्थ्यांना प्राचार्यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी प्रविण राठोड, दिपाली पाटील, योगेश अत्तरदे, विरसेन जमदाळे, आरती पाटील, दिपाली सुर्यवंशी, सपना सुलाखे यांनी आपले अनुभव व्यक्त केले. सुत्रसंचालन पुजा भालेराव हिने केले तर प्रास्ताविक आकाश तायडे व आभार भाऊसाहेब भालेराव यांनी मानले.