आयुष्यात पुढे जाण्यासाठी अभ्यासासोबत विविध कलेत प्रावीण्य मिळविणे गरजेचे -आमदार संजय सावकारे
भुसावळ – भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालय भुसावळ, कला मंडळ आयोजित नृत्यस्वरांजली कार्यक्रमाचे उद्घाटन ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.मोहन फालक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. गीत गायन, एकल नृत्य, समूह नृत्यातून विद्यार्थ्यांनी प्रसंगी कलागुणांची उधळण करीत उपस्थितांची दाद मिळवली.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजयकुमार नाहाटा, प्राचार्य डॉ.एम.व्ही.वायकोळे, उपप्राचार्य प्रा.डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बर्हाटे, नृत्यस्वरांजली कार्यक्रमाचे परीक्षक प्रा.सचिन भिडे, आर.डी.पाटील, कला मंडळ प्रमुख प्रा.एन.ई.भंगाळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक कला मंडळ प्रमुख प्रा.एन.ई.भंगाळे यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या नृत्यांना मिळाली दाद
नृत्यस्वरांजली कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी गीत गायन, गोंधळ, लावणी, गवळण, एकल नृत्य, समूह नृत्य उत्कृष्ट सादर केल्याने उपस्थितांनी त्यास उत्स्फूर्त दाद दिली. डॉ.मोहन फालक यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात आपल्या महाविद्यालयाची उत्तरोत्तर प्रगती होत असून ती अशीच प्रगती होत राहावी यासाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ.एम.व्ही.वायकोळे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला परीक्षक आर. डी. पाटील यांनी ‘ऐ मेरे जोहराजबी तुझे मालूम नही’ हे गीत सादर करून विद्यार्थ्यांची मने जिंकली.
समारोपास यांची प्रमुख उपस्थिती
पारीतोषिक वितरण कार्यक्रमास प्रमुख प्राहुणे म्हणून भुसावळचे आमदार संजय सावकारे, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहन फालक, चेअरमन महेश फालक, सचिव विष्णू चौधरी, कोषाध्यक्ष संजयकुमार नाहाटा, प्राचार्य डॉ.एम.व्ही.वायकोळे, उपप्राचार्य प्रा.डॉ.एस.व्ही.पाटील, उपप्राचार्य बी.एच.बर्हाटे व कला मंडळ प्रमुख प्रा.एन.ई.भंगाळे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.
कलेला मिळाला पाहिजे वाव -आमदार
आमदार संजय सावकारे यांनी ‘मै हू डॉन’ हे गीत सादर करून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, प्रत्येकात कला असतेच फक्त कलेसाठी वाव मिळाला पाहिजे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी अभ्यासासोबत विविध कलेत प्रावीण्य मिळविणे गरजेचे आहे. मी माझ्या महाविद्यालयीन जीवनात नाटक, गीत गायन वा इतर सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हायचो त्याचा फायदा मला नक्कीच झाला. जीवनात कितीही मोठ्या पदावर गेलात तरी आई-वडील व गुरुजनांना विसरू नका, असेही ते म्हणाले
यांनी मिळवला क्रमांक
गीत गायन स्पर्धेत प्रथम- नेहा जैसवाल, द्वितीय- प्रियंका पाटील, तृतीय आरती मोरे आली. एकल नृत्य स्पर्धेचे प्रथम अंकिता पाटील, द्वितीय रेषमा कोलते, तृतीय काजल भोळे आली. समूह नृत्य स्पर्धेचे प्रथम पारीतोषिक कोळी ग्रूप डान्स, द्वितीय केमिस्ट्री रॉकर्स ग्रूप तर तृतीय पारीतोषिक बी.बी.ए.बॉईज अॅण्ड गर्ल्स ग्रुप यांना मिळाले. सूत्रसंचालन स्पर्धेचे प्रथम कुमारसिंग पाटील, द्वितीय मानसी नेवे तर तृतीय किशोर महाले यांना मिळाले. पारितोषिक समारंभाचे सूत्रसंचालन प्रा.पी.पी.महाजन तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ.ए.डी.गोस्वामी यांनी केले.
यांनी घेतले परीश्रम
यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.ए.डी. गोस्वामी, प्रा.डॉ.के.के.अहिरे, प्रा.व्ही.डी.जैन, प्रा.ई.जी.नेहेते, प्रा.डॉ.विद्या पाटील, प्रा.डॉ.पी.ए.अहिरे, प्रा.एस.टी.धूम, प्रा.एस.के.राठोड, प्रा.डॉ.ममताबेन पाटील, प्रा.डॉ.आर.एस.नाडेकर, प्रा.प्रशांत पाटील, प्रा.डॉ.रूपाली चौधरी, प्रा.समाधान पाटील, प्रा.पी.पी.महाजन, प्रा.स्मिता बेंडाळे, प्रा.स्वाती शेळके, प्रा.शंकर पाटील, राजेश पुराणिक, प्रा.राजश्री देशमुख, प्रा.कुंदन तावडे, वैभव मावळे, प्रभारी प्रबंधक रेखा बर्हाटे, प्रभारी कार्यालय अधीक्षक भगवान तायडे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, कला मंडळ सदस्यांनी परीश्रम घेतले.