जळगाव:राज्याचे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर आज सोमवारी ते प्रथमच जळगावात आले आहे. दुपारी १२.१५ वाजता गीतांजली एक्स्प्रेसने त्यांचे जळगाव रेल्वे स्थानकावर आगमन झाले. यावेळी त्यांचा जल्लोषात स्वागत करण्यात आले. मोठ्या प्रमाणात फटक्याची आतिषबाजी करण्यात आली. ना.महाजन यांच्या मिरवणुकीसाठी हत्ती देखील आणण्यात आला होता. सोमवारी ते जळगावात येणार असल्याने भाजपचे कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची संपूर्ण तयारी केली होती. सकाळपासूनच कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी केली होती.
यावेळी नवनियुक्त खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, महापौर सीमा भोळे, उपमहापौर अश्विन सोनावणे, माजी महापौर ललित कोल्हे, भाजपचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.