ना.गुलाबराव पाटील यांच्या खासगी सचिवांची कोरोनाग्रस्तांसाठी एक लाखांची मदत

0

ना. पाटील यांच्याकडून दातृत्वाचे अशोक पाटील यांचे कौतुक

जळगाव – राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे खाजगी सचिव तथा या अधिकाऱ्यांनी अशोक पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एक लाख रुपयांची देणगी दिली.

अशोक पाटील यांनी या रकमेचा धनादेश नुकताच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मंत्रालयात सुपूर्द केला. राज्यात सध्या कोरोनाग्रस्तांसाठी समाजाच्या विविध संघटना, संस्थांकडून मदत येत असताना आपण देखील खारीचा वाटा उचलावा या हेतूने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ही मदत केली असल्याचे अशोक पाटील यांनी सांगितले. अशोक पाटील यांची उपक्रमशील व जन सामान्यांशी नाळ जुळलेले कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

दातृत्वाचे अशोक पाटलांचे कौतूक

लक्षणिय बाब म्हणजे अशोक पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केल्यामुळे मंत्र्याचे पहिले खासगी सचिव ठरले आहे. अशोक पाटलांच्या या दातृत्वामुळे त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनीही त्यांनी केलेल्या मदतीचे कौतुक केले असून समाजातील सर्वस्तरांतील नागरीकांनी याच पद्धतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करावी असे आवाहन केले आहे.