ना. पाटील यांचा दौरा तालुक्यास विकासात्मक वाटचालीकडे नेणार

0

अमळनेर । बाजार समितीतील विकास कामांच्या उद्घाटनासाठी तीन मंत्री येणार असून त्यांचे दौरा निश्‍चितपणे तालुका व मतदार संघास विकासात्मक वाटचालीकडे नेणारा ठरणार आहे. त्या दृष्टीने मंत्री महोदयांच्या स्वागतासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे, कोणी कितीही विरोध केला तरी सर्वाना सोबत घेऊन 18 जानेवारी रोजीचा कार्यक्रम यशस्वी होईल, असा विश्‍वास भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीत व्यक्त केला. विकास कामांच्या उदघाटनानिमित्त महसूल मंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील व मान्यवर उपस्थित राहतील.

कार्यक्रमाला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न
तालुक्याच्या हिताचा हा कार्यक्रम असताना काहीजण यास राजकीय स्वरूप देऊन वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु जनतेच्या आपल्या सरकारकडून अनेक अपेक्षा असल्याने विरोध करणार्‍यांनाही सोबत घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करू,कार्यकर्त्यांनी अश्या गोष्टींकडे लक्ष न देता कार्यक्रमाच्या नियोजनाकडे लक्ष केंद्रित ठेवावे,मिळेल ती जवाबदारी आनंदाने पार पाडावी,काही विकृत मंडळी खेळ घालण्याचा प्रयत्न करतील यासाठी सर्वांनी सतर्क राहावे,प्रत्यक्ष सरकारातील मंत्री महोदय आपल्या नगरीत येत असल्याने त्यांचे जंगी स्वागत करावयाचे असून प्रत्येकाने यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन वाघ यांनी केले. तर आमदार वाघ म्हणाले की, कोण काय? पत्रके काढून दिशाभूल करतो याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष न देता कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्नरत राहावे, असे आवाहन केले.

बैठकीत यांची होती उपस्थिती
या पार्श्‍वभूमीवर नियोजन करण्यासाठी भाजपा शहर ग्रामिण कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच बाजार समितीत पार पाडली. या बैठकीत जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार स्मिता वाघ, तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, शहराध्यक्ष शितल देशमुख, जि.प. सदस्य संगीता भिल, सोनू पवार, मिनाबाई पाटील, पं.स. सदस्य भिकेश पाटील, प्रफुल पवार, सरचिटणीस हिरालाल पाटील, जिजाब पाटील, उमेश वाल्हे, दिलीप ठाकूर तसेच मार्केट संचालक, पं.स. सदस्य, नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.