निंबोल दरोड्याप्रकरणी बर्‍हाणपूरच्या संशयीताची कसून चौकशी

0

12 दिवसानंतरही क्लू मिळेना ; भुसावळात पोलिस अधीक्षकांचे ठाण

भुसावळ- रावेर तालुक्यातील निंबोल गावातील विजया बँकेवर मंगळवार, 18 जून रोजी दुपारी 2 वाजून 20 वाजेच्या सुमारास टाकण्यात आलेल्या सशस्त्र दरोड्यात बँकेतील सहाय्यक व्यवस्थापक करणसिंह नेगी (31) यांच्यावर दरोडेखोरांनी गोळ्या चालवल्याने त्यांचा मृत्यू झाला होता तर घटनेला 12 दिवस उलटूनही या गुन्ह्याचा गुंता उलगडलेला नाही. गुन्ह्याच्या अनुषंगाने नाशिक परीक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक छेरींग दोर्जे यांनी खान्देशसह मध्यप्रदेशातील यंत्रणांशी समन्वय साधून गुन्ह्याचा गुंता उलगडण्याचे आदेश दिले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांसह अपर पोलिस अधीक्षक, विभागातील पोलिस उपअधीक्षकांनी शुक्रवारी बर्‍हाणपूर येथील ताब्यात घेतलेल्या संशयीताची कसून चौकशी केली मात्र त्यातून ठोस निष्कर्ष निघाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरोडा की अन्य कारणाने खून? निंबोल, ता.रावेर येथे विजया बॅँकेत सहायक व्यवस्थापक करणसिंग नेगी यांच्यावर गोळीबार करणार्‍या दोन्ही संशयीतांनी हेल्मेट घालून काम फत्ते केले. पोलिसांच्या नाकाबंदीच्या भीतीने रावेर-मोरगाव रस्त्याने पातोंडीमार्गे शेतरस्त्याने मध्यप्रदेशच्या दिशेने रवाना झाले मात्र संशयितांनी बॅँकेत प्रवेश केल्यानंतर पैशांच्याबाबतीत कुठलीही चर्चा केली नाही किंवा ते कॅशियरजवळ गेले नाहीत. थेट सहायक व्यवस्थापक नेगी यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर सायरन वाजताच त्यांनी पळ काढला. पैसे लुटण्याच्या उद्देशाने हा गोळीबार झाला नसावा. नेगी यांचा नुकताच साखरपुडा झालेला होता त्यामुळे या घटनेशी त्याचा काही संबंध तर नाही ना? अशीही चर्चा आहे. निंबोल, ता.रावेर येथे विजया बॅँकेत सहायक व्यवस्थापक करणसिंग नेगी यांच्यावर गोळीबार करणार्‍या दोन्ही संशयीतांनी हेल्मेट घालून काम फत्ते केले. पोलिसांच्या नाकाबंदीच्या भीतीने रावेर-मोरगाव रस्त्याने पातोंडीमार्गे शेतरस्त्याने मध्यप्रदेशच्या दिशेने रवाना झाले मात्र संशयितांनी बॅँकेत प्रवेश केल्यानंतर पैशांच्याबाबतीत कुठलीही चर्चा केली नाही किंवा ते कॅशियरजवळ गेले नाहीत. थेट सहायक व्यवस्थापक नेगी यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर सायरन वाजताच त्यांनी पळ काढला. पैसे लुटण्याच्या उद्देशाने हा गोळीबार झाला नसावा. नेगी यांचा नुकताच साखरपुडा झालेला होता त्यामुळे या घटनेशी त्याचा काही संबंध तर नाही ना? अशीही चर्चा आहे.

भुसावळात पोलिस अधीक्षक तळ ठोकून
निंबोल दरोड्याच्या अनुषंगाने शुक्रवारी दिवसभर पोलिस अधीक्षक भुसावळ पोलिस उपअधीक्षक कार्यालयात तळ ठोकून होते. अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानी, भुसावळचे उपअधीक्षक गजानन राठोड, मुक्ताईनगरचे संजय देशमुख, फैजपूरचे नरेंद्र पिंगळे, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम यांच्यासह बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार, तालुक्याचे रामकृष्ण कुंभार व अन्य अधिकारी तसेच तीनही जिल्ह्यातील गुन्हे शोख पथकातील कर्मचार्‍यांसह धुळे क्राईम ब्राँचचे कर्मचारी उपस्थित होते.

बर्‍हाणपूरच्या संशयीताची कसून चौकशी
गुन्ह्याच्या अनुषंगाने बर्‍हाणपूर येथील एका संशयीताला पथकाने सुरतमधून ताब्यात घेत गुरुवारी रात्री उशिरा भुसावळात आणले. शुक्रवारी या संशयीतासह अन्य काही रेकॉर्डवरील संशयीताची चौकशी करण्यात आली तसेच गुन्हा घडल्याच्या दिवसाचे आरोपींचे लोकेशनही तपासण्यात आले मात्र त्यात आरोपींचा सहभाग नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.