निंभोरा पोलिस ठाण्यात झाला विद्यार्थ्यांचा गौरव

0

निंभोरा बु। येथील पोलिस ठाण्यात रॉयल कला ग्रुप व पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दहावीच्या परीक्षेत यश संपादन करणारे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच अमनखान पठान हे होते.तर प्रास्ताविक, सूत्रसंचालन राजीव बोरसे यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थिनी महिमा सूर्यकांत चौधरी, आचल किशोर बोरोले, भुवनेश्वरी जितेंद्र बर्‍हाटे तसेच गुणवंत विद्यार्थी आफताब दस्तगीर खाटिक, मयूर दिनकर बोरनारे, शुभम पितांबर सपकाळे, मयूर सदाशिव गिरडे यासह आदींचा सत्कार करुन गौरव करण्यात आला.

प्रमुख अतिथींनी केले मार्गदर्शन
यावेळी सत्कारार्थी व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे, फौजदार ज्ञानेश्वर पाकळे, सरपंच डिगंबर चौधरी, रोहिदास ढाके, प्रल्हाद बोंडे, मनोहर तायडे, विजय सोनार, माजी सरपंच अमनखान पठाण, मुख्याध्यापक एच. वारके यांनी मनोगत व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी भास्कर पाटील, रमेश येवले, युनुस खान, मनोज सोनार, पोलीस पाटील सुधाकर पाटील, आरिफ खान, राजेंद्र बर्‍हाटे, किशोर बोरोले, दस्तगीर खाटिक, दिलीप सोनवणे, राजेश गुरव, काशीनाथ शेलोडे, स्वप्निल सोनार, स्वप्निल गिरडे, अमोल गिरडे, सोसायटी व्यवस्थापक प्रकाश चौधरी, चेतन पाटील, सचिन महाले, आशिष बोरसे, सर्फराज खान, जितेंद्र कोळी, चंद्रकांत कोळी, सागर तायडे, किरण सपकाळे, मुकेश अवसरमोल, मंसूर पिंजारी, रफीक खान, मगन उमक आदी मान्यवर व पोलिस, होमगार्ड उपस्थित होते. आभार प्रदर्शन वराडे पोलिस यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रॉयल कला ग्रुप ने परिश्रम घेतले.